ब्रेकिंग

पंढरीच्या पादुका प्रतिवार्षिक परम विठ्ठलभक्त संत गोदड महाराज नगरी कर्जतला आणण्याबाबत आ. रोहित पवारांचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला निवेदन

कर्जत प्रतिनिधी

पंढरीच्या पादुका प्रतिवार्षिक परम विठ्ठलभक्त संत गोदड महाराज नगरी कर्जतला आणण्याबाबत आ. रोहित पवारांचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला निवेदन


कर्जत प्रतिनिधी


कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे नुकतेच पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व विशेष कार्यकारी अधिकारी बालाजी पुदलवाड यांची भेट घेतली आहे.
आ.रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कर्जत शहरात विठ्ठलाचे परमभक्त संतश्री सद्गुरू गोदड महाराज यांची संजीवन समाधी आहे. संतश्री गोदड महाराज यांचा जन्म कर्जत शहरात झाला होता आणि त्यांनी अनेक वर्षे विठ्ठलाची मनोभावे तपसाधना केली. तसेच त्यांना पांडुरंगाने साधू वेशात येऊन “तू तुझ्या जन्मस्थळी समाधीस्थ हो ते एक महाक्षेत्र म्हणून उदयास येईल”, असा आशीर्वाद दिला.त्यावेळी महाराजांनी पांडुरंगाकडून एक वचन घेतले व म्हणाले, “पांडुरंगा तुला माझ्या भेटीसाठी माझ्या जन्मगावी कर्जत येथे यावे लागेल”, त्यावेळी पांडुरंगांनी त्यांना वचन दिले आणि आषाढीनंतर येणाऱ्या आषाढी वैद्य कामिका एकादशीला मी तुम्हाला भेटायला कर्जतला येईल असे सांगितले. तेव्हापासून ते सद्गुरू गोदड महाराजांच्या भेटीला कर्जतला येतात, असं म्हटलं जातं. त्यावेळी पांडुरंगाची मूर्ती रथामध्ये ठेवून ग्रामप्रदक्षिणा घातली जाते. यासाठी कर्जत तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविक कर्जत शहरात दाखल होतात व सद्गुरू गोदड महाराज व पांडुरंगाचे दर्शन घेतात. म्हणून सर्व संतांच्या दिंड्या आषाढी कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जातात. परंतु महाराजांची दिंडी वारीसाठी पंढरपूरला जात नाही.अशा या साक्षात्कारी संत महात्म्याच्या अधिकाराची व वरिष्ठ भक्तीची कल्पना आमदार रोहित पवार यांनी मंदिर समितीचे सदस्य आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांना दिली आणि अशा संताच्या विठ्ठल भक्तीची पावती म्हणून त्यांच्या सन्मानार्थ प्रतिवर्षी मागवैद्य या दिवशी पंढरपूरहुन विठ्ठलाच्या पादुका पाठवण्याचा औचित्यपूर्ण उपक्रम राबवावा, अशी विनंती केली आहे. तसेच लोकभावना व श्रद्धा लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून सादर केलेल्या या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हा उपक्रम राबवल्यास या विठ्ठल भक्त संताचा नक्कीच सन्मान होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. कर्जत मध्ये राहणारे नागरिक, लोकप्रतिनिधी व मानकरी यांनी या मागणीचे पत्र जळगावकर महाराजांना दिले.या वेळी पंढरपूरमध्ये कर्जत नगर पंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षा सौ उषा राऊत.नामदेव देवा राऊत ,सुनील शेलार, रोहिणीताई घुले, सतीश पाटील, संतोष म्हेत्रे, प्रतिभाताई भैलूमे, संतोष म्हेत्रे, अभय बोरा, मोनालीताई तोटे, प्रसाद ढोकरीकर, लालासाहेब शेळके, रज्जाक झारेकरी, भास्कर भैलुमे, देविदास खरात, हर्षदा काळदाते, रवींद्र सुपेकर, ताराबाई कुलथे यांच्यासह प्रमुख मानकरी मेघादादा पाटील यांच्यासह कर्जतमधील इतरही मानकरी, स्थानिक नागरिक व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे