गुन्हेगारीब्रेकिंग

खुनाच्या खटल्यात ८ वर्षे गैरहजर राहणाऱ्या आरोपीस कर्जत पोलिसांकडून अटक..

कर्जत प्रतिनिधी

खुनाच्या खटल्यात ८ वर्षे गैरहजर राहणाऱ्या आरोपीस कर्जत पोलिसांकडून अटक..


कर्जत प्रतिनिधी –



आकाश्या पैंजण्या काळे, वय-५६ वर्ष, रा पिंपळवाडी, ता कर्जत याच्यावर कर्जत पोस्ट गुर नंबर 150/2013 भादविका कायदा कलम 302, 201, 34 प्रमाणे दाखल झाला होता. सदर खटला हा जिल्हा सत्र न्यायाधीश सो अहमदनगर यांच्या कोर्टात चालू होता. सदर आरोपी हा ६ महिने तारखांना हजर राहिला परंतु नंतर ते सात-साडेसात वर्ष तारखेस गैरहजर होता. सन 2019 मध्ये सेशन कोर्ट श्रीगोंदा झाल्याने सदरची केस ही जिल्हा व सत्र न्यायालय श्रीगोंदा यांचे न्यायालयात वर्ग झाली. सदर आरोपी हा वारंवार गैरहजर होता त्यास वॉरंट काढले होते. वारंवार शोध घेऊनही तो मिळून येत नव्हता.
गु र नं 150/13 भा द वी 302,201 मधील फिर्यदिने तक्रार दिली की आरोपी 1) राजा उर्फ सचिन आकाश काळे वय 22 राहणार पिंपळवाडी तालुका कर्जत 2) धर्मा गंडीशा काळे, वय 34, राहणार पिंपळवाडी, तालुका कर्जत, 3) कांताबाई उर्फ कांचन गजाबापू भिसे, वय 40, राहणार भांबोरा तालुका कर्जत
4) आकाश पैंजण्या काळे राहणार पिंपळवाडी तालुका कर्जत दिनांक यांनी दिनांक 30.7.12 रोजी सकाळी नऊ वाजता सुमारास बारडगाव सुद्रिक गावचे शिवारात कोणत्यातरी हत्यारांनी हनवटीवर, डोक्यावर मारहाण करून खून करून प्रेत कॅनॉल च्या पाण्यात टाकून देऊन पुरावा नष्ट केला आहे. वगैरे मजकूरचे फिर्यादी वरून गुन्हा रजिस्टर दाखल केला होता. त्यावरून आरोपींना अटक करण्यात आली होती.
सुरुवातीस सहा महिने सदर आरोपी सुनावणी कामे कोर्टात हजर राहिला परंतु त्यानंतर सलग आठ वर्ष गैरहजर होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय 1 श्रीगोंदा यांनी अजामीनपात्र वॉरंट काढले होते.
सदर आरोपीस गोपनीय माहिती काढून त्यास दिनांक 25/09/2022 रोजी रात्री 20/20 वाजता कर्जत पोलिसांनी पिंपळवाडी जंगल परिसरातून अटक केले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक फौजदार बाळासाहेब यादव पोलीस जवान दिपक कोल्हे कर्जत पोलीस स्टेशन यांनी केली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे