ब्रेकिंग

शिंदे-फडणवीस सरकारचा ओबीसी समाजाकरिता महत्वपूर्ण निर्णय

कर्जत प्रतिनिधी

शिंदे-फडणवीस सरकारचा ओबीसी समाजाकरिता महत्वपूर्ण निर्णय


आज महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यात 72 वसतिगृहे (प्रत्येक जिल्ह्यात 2) सुरु करण्याचा निर्णय घेऊन 10 वी नंतर च्या स्वताच्या गाव-शहराबाहेर शिक्षण घेणाऱ्या सर्व ओबीसी विद्यार्थी बंधू भगिनींना मोठा दिलासा मिळनार आहे.
या सोबतच ओबीसी,व्ही. जे.एन. टी. प्रवर्गातिल गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता 50 विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या आधी हा लाभ फ़क्त 10 विद्यार्थ्यांनाच मिळत होता. या शिष्यवृत्ती योजनेमुळे आपल्या राज्यातील ओबीसी, व्ही.जे.एन.टी.प्रवर्गातिल 50 विद्यार्थी दरवर्षी परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकतात. तसेच ओबीसी समाजातील पीएचडी व स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याना नियमित विद्यावेतन देऊन सक्षम करण्या बाबतचा पण निर्णय आजच्या मंत्रिमंडलाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.या तिन्ही ओबीसी हिताच्या निर्णयाचे भाजपा ओबीसी मोर्च्याच्या वतीने स्वागत करण्यात येते.याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी फडणवीस, ओबीसी कल्याण मंत्री मा.अतुलजी सावे व मंत्रिमंडलातील सर्वं मान्यवर मंत्री महोदयाचे अभिनंदन करून ओबीसी समाजाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो.सदर निर्णयाची अभिनंदन पर बातमी आपल्या सर्व प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांनी स्थानीय वृत्तपत्रात द्यावी,याबाबत अभिनंदनाचे Flex व Banner (प्रोटोकॉल नुसार) स्थानिक ठिकाणी लावावे व सोशल मीडिया वर सुद्धा पोस्ट करावे, ही विनंती संजय गाते प्रदेश सरचिटणीस, भाजपा ओबीसी मोर्चा..
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे